छात्र युवा संघर्ष समिती (CYSS) व 'आप' युवा आघाडी (AYW) कडून परीक्षा फी परत करण्याची मागणी

प्रेस नोट
छात्र युवा संघर्ष समिती (CYSS) व 'आप' युवा आघाडी (AYW) कडून परीक्षा फी परत करण्याची मागणी


कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या.  विद्यापीठ परीक्षा शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून 200 ते 2000 रुपये घेतले गेले आहेत. कोविड-19 महामारीमुळे पालक वर्गाला देखील आर्थिक ताण सोसावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता 'आप' ची विद्यार्थी आघाडी असलेल्या 'छात्र युवा संघर्ष समिती' (CYSS) व 'आप' युवा आघाडी (AYW) ने परीक्षा फी रद्द करून परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे ही मागणी केली आहे. या मागणीसाठी 'आप' च्या वतीने पुणे व मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्रे लिहली आहेत पण त्याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

या मागणीला पुढे नेत आज CYSS व AYW च्या वतीने #परीक्षा_फी_परत_करा हे हॅशटॅग वापरून ट्विटर कॅम्पेन चालवण्यात आले.

यावेळी CYSS चे महासचिव महेश सामंत म्हणाले, "लोकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक ताण आला आहे. महाराष्ट्रात बरेच विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील, कामगारवर्गातील व काही स्वतः कमवून शिकणारे आहेत. परीक्षा फी परत मिळाल्यास या विद्यार्थ्यांच्या परिवाराला बरीच मदत मिळू शकेल. जोपर्यंत परीक्षा फी परत मिळत नाही, तोपर्यंत CYSS प्रयत्न करत राहील".
AYW चे उपाध्यक्ष संदीप सोनावणे म्हणाले, "कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अंतिम वर्ष सोडून इतर सर्व परीक्षा रद्द झालेल्या असताना अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करणे म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे".

'आप' चे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले, " आप सातत्याने सामान्य माणसासाठी आवाज उठवत आला आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाल्यास त्यांना बरीच मदत होईल"

कळावे,
उत्तम पाटील,Media Convener & प्रवक्ता,
'आप' युवा आघाडी - महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post