PRESS RELEASE / प्रेस नोट
ज्येष्ठ पत्रकार द्विजेंद्र तिवारी यांचा आम आदमी पक्षात प्रवेश
हिंदी माध्यम क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार द्विजेंद्र तिवारी यांनी आज 'आम आदमी पक्ष - महाराष्ट्र' मध्ये प्रवेश घेतला. द्विजेंद्र तिवारी यांनी अनेक प्रतिष्ठित हिंदी वृत्तपत्र जसे जनसत्ता व हमारा महानगर यांत काम केलेले आहे.
"श्री. तिवारी यांना माध्यम क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव आहे, पत्रकार म्हणून त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून न्याय बाजू मांडण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. आम आदमी पक्षाला निश्चितच त्यांच्या अनुभवाचा निश्चित लाभ होईल. आम आदमी पक्षात आम्ही त्यांचे स्वागत करीत आहोत." असे मत आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा-मेनन यांनी व्यक्त केले.
धन्यवाद,
मीडिया टीम,
आप - महाराष्ट्र
Tags
Press Note